Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेत महत्वपूर्ण बदल; नवा आदेश जारी

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Latest Update

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : राज्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला अधिक सुलभ बनवम्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी नवा आदेश जारी केला आहे. (ladki bahin new gr) त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून योजनेचा लाभ घेण्यासाठी रोज लाखो अर्ज भरले जात आहेत. या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता या योजनेसाठी यशस्वी अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीसेविका, एनयुएलएमचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्षप्रमुख, सीएमएम, आशासेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्रांना एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतियशस्वी पात्र लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. ( हा प्रोत्साहन भत्ता लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर दिला जाईल).

माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले महत्वपूर्ण बदल

– विवाह नोंदणी प्रमाणपत्र: नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

– जन्म प्रमाणपत्र: परराज्यात जन्म झालेल्या व त्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

– रेशनकार्ड आणि मतदान कार्ड: महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येईल.

– बँक खाते: पोस्टात असलेले बँक खाते ग्राह्य धरणात येईल.

  • या योजनेसाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडीसेविका, एनयूएलएमचे समूह संघटक, मदत कक्षप्रमुख व सीएमएम आशासेविका, सेतू सुविधा केंद्र आणी आपले सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी नेमले आहे.
  • केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पीएफएमएस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
  • केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील. त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार आथेंटीकेशन यापूर्वीच झाल्याने त्या लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या योजनेचा थेट लाभ दिला जावा, असा आदेश देण्यात आला आहे.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana News: अजून अर्ज भरायचे राहिलेल्यांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article