सध्या, माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कसा व कुठे करावा? Majhi Ladki Bahin Yojana New Registration Online

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana New Registration Maharashtra 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Application Form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून आजूनही अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जच केलेला नाही. अर्ज न केलेल्या महिलांच्या मनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्ता नवीन अर्ज करता येतो का? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? असे अनेक प्रश्न आहेत. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज केला नसेल तर लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या… (Learn about the new registration process for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Find out when and where eligible women can apply, required documents, and how to complete the application at an Anganwadi center after December 1st).

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration : 1 जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाली. त्यानंतर रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यास सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Registration Process : याआधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, “समूह संघटक -CRP (NULM, MSRLM आणि MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तिंना लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. पण नंतर नवीन शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच करता येतो.

Majhi Ladki Bahin Yojana New Registration Date : मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 6व्या (डिसेंबर) महिन्याच्या हफ्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. आणी त्यानंतर 1 डिसेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होईल.

🔴 हेही वाचा 👉 तरच मिळतील लाडक्या बहिणींना 2100 रुपये’; अस का म्हणाले अमित शाह.

लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा?

सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येत नाही. 1 डिसेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड,
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
  • मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • बँकेचे पासबूक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

🔴 हेही वाचा 👉 महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमाह 3000 रुपये.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now