Majhi Ladki Bahin Yojana: नवीन वेबसाइट सुरू! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे आता झाले सोपे

3 Min Read
🔴 हे वाचलं का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana News Today : महाराष्ट्रात 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

Majhi Ladki bahini yojana Application Form Update : 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्यासाठी अजूनही महिलांची मोठी गर्दी होत आहे. अर्ज करण्यासाठी राज्यभरात सेतू केंद्र, आपले सरकार तसेच अंगणवाडी केंद्रात महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

मोठ्या प्रमाणात महिलांचे अर्ज येत असल्याने अनेकदा काही तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. संकेतस्थळ बंद, सर्व्हर डाऊन यांसारख्या समस्या वारंवार येत होत्या. त्यावरच उपाय म्हणून सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन वेबसाईट सुरू केली असून आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन भरता येणार आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या वेबसाइटवरून करता येणार अर्ज?

Ladki bahin yojana official website:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत करणार आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर आतापर्यंत महिला ऑफलाईन किंवा नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करत होत्या. पण सरकारने यासाठी आता नवीन वेबसाइट सुरू केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. नवीन वेबसाईटमुळे महिलांना गाव, वॉर्ड आणी तालुक्याची निवड करणे आता सोपे होणार आहे.

🔴 ही बातमी वाचली का? 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी फक्त ‘याच’ महिला पात्र असणार!

राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल. याशिवाय, महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. अशाच महिलांना योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणत्या महिला ठरणार अपात्र?

ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील. घरातील एखादा सदस्य Tax भरत असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल किंवा कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now