माझी लाडकी बहीण योजणेसाठी आता करता येणार नाहीत ऑनलाईन अर्ज, आता फक्त एकच पर्याय? Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Offline Only

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सेवा आता बंद करण्यात आली आहे. अजूनही ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्या महिला आता ऑनलाईन अर्ज करू शकणार नाहीत. 

महाराष्ट्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 2 हफ्ते देण्यात आले आहेत. माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली असली तरी ज्या महिला नवीनच अर्ज करणार आहेत व त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ हवा असेल त्यांनी सरकारकडून तिसरा हफ्ता जमा करण्यापूर्वी अर्ज करायला हवा. जर वेळेत त्यांचा अर्ज मंजुर झाला तरच त्यांना सप्टेंबर चा 1500 रुपयांचा हफ्ता मीळेल.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद

नारी शक्ति दूत ॲप आणी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत होते. पण आता ते करता येत नाहीत. नारी शक्ति दूत ॲपद्वारे फॉर्म भरताना ‘NO NEW FORM ACCEPTED ‘ असा मेसेज येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरताना ‘अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा’ असा मेसेज येत आहे.

सध्या अर्ज भरण्यासाठीचा पर्याय

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद झाल्याने आणी ईतर सर्व स्वीकृत व्यक्तींचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्यात आल्याने माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज भरण्याचा पर्याय शिल्लक आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज भरल्याने अर्ज मंजूर होण्याचा वेग वाढेल आणी महिलांना अर्ज भरल्यानंतर जास्त दिवस वाट पाहत बसाव लागणार नाही.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article