Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Payment Issue : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरताना अनेक महिलांनी अर्ज व्यवस्थित भरला असून त्यांचे चालू असलेल्या बँकेचा तपशील सुद्धा व्यवस्थित भरला होता. पण अर्ज भरताना महिलांकडून एक चूक झाली ती म्हणजे आधारकार्डशी लिंक असणाऱ्या बँक अकाऊंटचा तपशील देणे.
Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र सरकारने सूरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रूपये जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत त्यांना पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ मीळेल. पण सरकारकडून पैसे पाठवून सुद्धा अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमाच झाले नाहीत.
माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरताना अनेक महिलांनी अर्ज व्यवस्थित भरला होता. त्यांचे चालू असलेल्या बँकेचा तपशील सुद्धा दिला होता. मात्र अर्ज भरताना महिलांकडून एक चूक झाली ती म्हणजे आधारकार्डशी लिंक असणाऱ्या बँक अकाऊंटचा तपशील देणे. महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना त्यांचे आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे न तपासताच बँक खात्याबद्दल माहिती दिली.
सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवताना आधार क्रमांकाच्या सहाय्याने पैसे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचे आधारकार्ड ज्या बँकेशी लिंक असेल त्याच बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. यामुळेच जर तुम्ही आधी एखादे अकाऊंट उघडले असेल आणि सध्या ते अकाउंट वापरात देखील नसेल आणि जर त्या बँक अकाउंटशी आधार लिंक असेल तर तरी त्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.
अनेक महिलांच्या बाबतीत असे झाले आहे की महिलांच्या जून्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. आणी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्या झाल्या त्यांच्या खात्यात यापूर्वी मिनिमम बॅलन्स नसल्या कारणाने जमा झालेले पैसे कट झाले आहेत.
अशी प्रकरणे समोर येताच सरकारकडून अशा परिस्थितीत महिलांच्या बँक खात्यातून पैसे कट न करण्याचे आदेश बँकाना देण्यात आले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 अंशत: रद्द अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा तातडीने दाखल करा.