जर आज खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचं? येथे जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Credited

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Credited Solution

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Update : जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात 4500₹ जमा झाले असून. यापूर्वी 3000₹ जमा झालेल्या व सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात आज 1500₹ जमा होणार आहेत. पण जर उद्या पर्यंत बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायच? त्याबद्दल जाणून घेऊयात… (What to do if your Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana payment isn’t credited? Learn how to resolve payment issues and ensure timely receipt of benefits).

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली होती. पण सरकारकडून वेळेपूर्वीच बँकांना योजनेचे पैसे पाठवण्यात आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरु झाली. आणी जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

तर आज सप्टेंबर महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये तर जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 1500 रुपये जमा होणार आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पण सप्टेंबर महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असाल आणी जर तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तर तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. पण जर 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत तर?…

जर बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर?

Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Credited Solution : अर्ज पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. आणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही, याची खात्री करावी. आणी नसल्यास लवकरात लवकर बँक आधार लिंक करून घ्यावे. बँक खात्याशी आधार लिंक नसणे हे पैसे जमा न होण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. 

तसेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते धारकांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक बँक खाते सुरु करावे लागेल. आणी ते खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल. मग त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article