Majhi Ladki Bahin Yojana Political Debate Maharashtra: महाराष्ट्रातील चर्चेत असलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून राजकीय वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी या योजनेवर टीका करत सत्ताधारी सरकारवर निवडणूक जुमल्याचा आरोप केला आहे. या टीकेला महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (Majhi Ladki Bahin Yojana sparks political debate as Praniti Shinde calls it an election gimmick, while Minister Aditi Tatkare defends the scheme. Read the latest updates on Maharashtra’s women empowerment initiatives and political reactions).
प्रणिती शिंदेंची टीका
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “लाडकी बहीण ही योजना फक्त निवडणूक जिंकण्यासाठीचा एक जुमला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोरीत गेला असून, इतर योजनांसाठीचे आर्थिक स्रोत थांबवले गेले आहेत.”
प्रणिती शिंदेनी सरकारवर सणसणीत टीका करत म्हटले, “निवडणुकीपुरते महिलांना लाडकी बहीण म्हणून आता सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे.”
आदिती तटकरे यांचे प्रत्युत्तर
अदिती तटकरे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले, “लाडकी बहीण योजनेची सुरुवातीपासूनच विरोधकांना अॅलर्जी आहे. विरोधक एकीकडे योजनेचा खर्च जास्त असल्याचे म्हणतात, तर दुसरीकडे महिलांना अधिक मदत द्यावी, अशी मागणी करतात. हे दुटप्पीपणाचे उदाहरण आहे.”
अदिती तटकरे यांनी ठामपणे सांगितले की, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू ठेवली जाईल.”
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी घेणार? मंत्री अदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा.
प्रणिती शिंदेंची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
प्रणिती शिंदे यांनी बीडमधील गुन्हेगारी प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही टीका केली. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, “आमच्या काळात नैतिक जबाबदारी घेतली जायची, पण हे सरकार अहंकारी असल्याने कोणताही निर्णय होईल असे वाटत नाही.”
लाडकी बहीण’ योजना चर्चेत का?
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीची मोठी आशा बनली आहे. ही योजना सध्या महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत देते, तर लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹2100 देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेला (Mazii Ladki Bahin Yojana) महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला, तरी विरोधकांकडून वारंवार या योजनेवर टीका केली जात आहे. राजकीय वाद आता कुठे थांबेल, का आणखी पेट घेईल, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! ‘या’ महिलांना जानेवारी महिन्यापासून मिळणार नाही योजनेचा लाभ.