अंशत: रद्द अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा तातडीने दाखल करा, Majhi Ladki Bahin Yojana

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Resubmit Correct Disapproved Applications

Majhi Ladki Bahin Yojana Disapproved Form : अनेक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये अद्याप जमा झाले नसल्याने त्या महिलांना आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही असा प्रश्न पडला आहे. सरकारकडून अंशत: रद्द करण्यात आलेल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या योजनेच्या लाभापासून राज्यातील पात्र महिला वंचित राहू नयेत यासाठी शासन प्रयत्नशील असून, शासनाकडून अर्ज तपासल्यानंतर Disapproved म्हणजेच अंशतः रद्द करण्यात आलेल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करुन अर्ज तातडीने Online Resubmit करण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Disapproved अर्ज तातडीने Resubmit केल्यास त्यांची लवकरात लवकरच पडताळणी करुन पात्र लाभार्थी महिलांना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणतीही पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही हा यामागचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती दूत या मोबाईल ॲपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य महिलांचे अर्ज भरले असतील अशा सर्व महिलांनी तसेच समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचतगट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका/मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मदतकक्ष प्रमुख यांना शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, नारीशक्ती दूत ॲप मधील तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगीन करुन ‘यापूर्वी केलेले अर्ज’ या ऑप्शनावर क्लिक करुन तुमच्याद्वारे सबमिट केलेल्या संपूर्ण अर्जाची यादी चेक करून. त्यांचे स्टेट्स (Aprroved, Disapproved, Pending, Rejected) त्यातील Disapproved स्टेट्स असलेल्या सर्व लाभार्थ्यांशी संपर्क साधावा.

View Reason या टॅबवर अर्ज रद्द होण्याचे कारण पाहून त्याप्रमाणे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form या टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form पुन्हा Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची संबंधितानी नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article