३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच मिळणार लाभ Majhi Ladki Bahin Yojana New Update

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana September Installment

Majhi Ladki Bahin Yojana September Installment : माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मीळेल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री (Aditi Varda Sunil Tatkare) आदिती तटकरे यांनी दिली. (The verification process for Majhi Ladki Bahin Yojana applications submitted after July 31 is underway. Eligible women will soon receive the scheme’s benefits, says Minister Aditi Tatkare.)

माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी ३१ जुलै नंतर केलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया युद्धपातळीवर   सुरू आहे. ज्या महिलांनी ३१  जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या  पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. सध्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून ३१ जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांना लवकरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

पुढे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  महिलांनी केलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर केली जाते त्यानंतर जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी महिलांना लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे आता लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यातून एकूण २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत.

अर्ज पात्र ठरलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article