Majhi Ladki Bahin Yojana Update Who Will Not Get 1500 Rupees: मुख्यमंत्री माझो लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेतील काही महिलांची नावे लवकरच वगळली जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीतील अशा महिलांचे नावे वगळली जातील, ज्या योजनेसाठी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. (Big update on Majhi Ladki Bahin Yojana in Maharashtra! Know which women will no longer receive 1500 rupees under this scheme. The government is set to remove ineligible beneficiaries based on income and other criteria. Check if your name is on the list).
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
गुरुवारी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल, असे सांगितले. यासाठी आर्थिक उत्पन्न, स्थावर मालमत्ता, आधार कार्डची अचूकता रहिवास यांसारख्या निकषांचा वापर केला जाईल.
कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ?
- वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबातील महिला.
- घरातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन किंवा महिलेच्या नावावर दुचाकी असलेल्या महिला.
- लग्नानंतर इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिला.
- आधार कार्ड आणि बँक खाते माहिती जुळत नसलेल्या महिला.
महायुती सरकारने २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. या योजनेवर सरकारचा ४६,००० कोटी रुपये वार्षिक खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.
आयकर विभागाच्या मदतीने कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाईल. तपासणीनंतर पात्र नसलेल्या महिलांचे नावे यादीतून काढून टाकली जातील. यामुळे या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळेल, याची खात्री केली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महत्त्वपूर्ण अपडेट महिलांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. तरी, योजनेच्या सर्व पात्रतेच्या निकषांचे पालन करणाऱ्या महिलांचा लाभ सुरूच राहील.
🔥 हेही वाचा 👉 अखेर ‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी सुरु.