Majhi Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना निवडावी लागणार एकच योजना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान

2 Min Read
Manikrao Kokate On Majhi Ladki Bahin Yojana New Eligibility Criteria 2025

Manikrao Kokate On Majhi Ladki Bahin Yojana New Eligibility Criteria 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये (Mazi Ladki Bahin Yojana) काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत काही नवीन निकष लागू होणार असून, आता महिलांना एकाच योजनेचा लाभ घ्यावा लागेल, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. (Manikrao Kokate highlights new rules for Majhi Ladki Bahin Yojana. Women must choose between Namo Shetkari Mahasamman Yojana or Mazi Ladki Bahin Yojana benefits. Learn more about eligibility updates).

महिलांसाठी नवे नियम लागू होणार?

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, काही महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे न जमा झाल्याचा आरोप होत आहे. याशिवाय, काही लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

कृषीमंत्र्यांचे स्पष्ट विधान

पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, “एका वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. महिलांनी निर्णय घ्यायचा आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा.”

योजना निवडीचे महिलांना स्वातंत्र्य

महिलांनी दोन्ही योजनांपैकी एक निवडावी, असे कृषीमंत्र्यांनी आवाहन केले. लाडकी बहीण योजनेच्या सध्याच्या नियमांनुसार, एकाच महिलेला दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही. अन्यथा, नवीन शासन निर्णय काढावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन निकष लागू होण्याचा निर्णय महिलांसाठी कसा फायदेशीर?

लाडकी बहीण योजनेत नवीन निकष लागू केल्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळता येईल, तसेच योजनेच्या निधीचा योग्य प्रकारे वापर करता येईल. त्यामुळे फक्त गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, आणि लाडकी बहीण योजनेच्या हफ्याची रक्कम वाढ शक्य होईल.

महिलांसाठी काय महत्त्वाचे?

जर तुम्ही या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल, तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना सर्व निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करा. योजनांमध्ये झालेल्या बदलांची माहिती घ्या व योग्य निर्णय घ्या.

सरकारच्या निर्णयावर महिलांचा कसा प्रतिसाद?

राज्यभरातुन महिला यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेचे (Majhi Ladki Bahin Yojana) नियम अधिक स्पष्ट करून महिलांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाईसाठी सरकारकडून काय पाऊले उचलली जात आहेत?.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now