लाडक्या भावांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 20 लाख रुपयांच कर्ज, अर्थसंकल्पात सीतारामण यांची मोठी घोषणा

4 Min Read
Maza Ladka Bhau Yojana Good News Pm Mudra Yojana Marathi Information

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात (Maza Ladka Bhau Yojana) माझा लाडका भाऊ योजना सुरु केल्याने ती योजना लाभदायी नसल्याचा आरोप करत विरोधक टीका करत होते. त्यातच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अर्थ संकल्प सादर केला त्यात अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातीलच एक घोषणा म्हणजे सरकारने मुद्रा कर्जाची (Mudra Loan) मर्यादा आता दुप्पट केली आहे.

Pradhan Mantri Mudra Yojana

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. सरकारने मुद्रा कर्जाची (Mudra Loan) मर्यादा आता दुप्पट केली आहे. या योजनेअंतर्गत आता 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज घेता येणार आहे. पण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? यासाठीची पात्रता काय आहे याविषयीं सविस्तर माहिती जाणून घ्या…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Pm Mudra Yojana Marathi Information

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी 2015 मध्ये ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (PMMY) सुरु केली आहे. यापूर्वी या योजनेतून 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले पण आता सरकारने कर्ज मर्यादा दुप्पट केली आहे. आता या योजनेतून 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळणार आहे. या योजनेतून बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज मिळते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कोण घेऊ शकत लाभ?

(Pradhan mantri mudra loan yojana eligibility in marathi):

देशातील जे युवक बेरोजगार आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे युवक. किंवा ज्यांचा आधीपासून व्यवसाय आहे आणी त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे पण त्यांच्याकडे भांडवल नाहीत किंवा कमी भांडवल आहे, अशांना या योजनेचा लाभ मिळतो.

सध्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज खालील 3 श्रेणींमध्ये दिले जाते

  • 1. शिशू कर्ज: यात 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
  • 2. किशोर कर्ज: यात 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • 3. तरुण कर्ज: यात 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी काय करावे?

How to take pm mudra loan in marathi online:

तुम्हाला जर मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर प्रथम तुम्हाला व्यवसाय योजना तयार करावी लागेल. तसेच योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे बँकेला द्यावी लागतील. बँक तुम्हाला बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर महत्वाची कागदपत्रे मागेल. ती कागदपत्रे तुम्हाला बँकेला द्यावी लागतील.

पीएम मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे?

  • – कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • – अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कोणताही बँक डिफॉल्ट इतिहास नसावा.
  • – कोणताही व्यवसाय ज्यासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे ती कॉर्पोरेट संस्था नसावी.
  • – कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • – कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

या योजनेचे फायदे काय?

Pradhan Mantri Mudra Yojana Benefits in marathi:

  • – कर्ज तारणमुक्त आहे.
  • – कर्जाचा परतफेड कालावधी 12 महिने ते 5 वर्षे. पण तुम्ही 5 वर्षात परतफेड करू शकत नसाल तर तुमचा कार्यकाळ आणखी 5 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.
  • – मंजूर केलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत नाही. फक्त मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज द्यावे लागते.
  • – भागीदारीत व्यवसाय असेल तरी मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता.

PMMY कर्ज कसे मिळवायचे?

1. मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट [mudra.org.in](https://mudra.org.in) वर जा.

2. होमपेज वर तीन प्रकारचे कर्ज – शिशु, किशोर आणि तरुण दिसतील, तुमच्या गरजेनुसार श्रेणी निवडा.

3. नवीन पेज उघडेल, तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि या अर्जाची प्रिंट काढावी लागेल.

4. अर्ज नीट भरा, फॉर्ममध्ये काही कागदपत्रांच्या छायाप्रती विचारल्या जातील. आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यावसायिक पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इ.

5. शेवटी हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा. बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. आणि तुम्हाला 1 महिन्याच्या आत कर्ज दिले जाईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article