Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची उडाली झोप, येत आहेत खूप मोठ्या अडचणी

3 Min Read
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Beneficiary List Check Server Issues (Image Credit : ladakibahin.maharashtra.gov.in)

Mazi Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 19 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यासाठी लाभार्थी महिलांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजना यादी (Ladki Bahin Yojana Beneficiary List) मध्ये नाव चेक करण्यासाठी आणी त्याचबरोबर ज्या महिलांनी अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अधिकृत वेबसाईट (ladki bahin.maharashtra.gov.in) आणी नारीशक्ती दूत ॲप (nari shakti doot) चा वापर करावा लागतो. पण ‘सर्व्हर डाऊन’मुळे महिलांना लाडकी बहीण योजना यादी चेक करणे, नवीन अर्ज करणे या कामात खूप मोठ्या अडचणी येत आहेत.

माझी लाडकी बहिन योजना 2024 लाभार्थी यादी सर्व्हर समस्या
माझी लाडकी बहिन योजना 2024 लाभार्थी यादी सर्व्हर समस्या

Majhi Ladki Bahin Yojana News Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरावे लागतात. त्यासाठी अधिकृत वेबसाईट आणी नारीशक्ती दूत ॲप चा वापर करावा लागतो. अर्ज करणाऱ्या महिला तसेच अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी ज्या ॲप्लिकेशनचा वापर करतात त्या नारीशक्ती ॲप्लिकेशनच्या ‘सर्व्हर डाऊन’मुळे ते ॲप्लिकेशनच व्यवस्थितरीत्या चालत नाही, अनेकदा ते ओपनच होत नाही, ओपन झाले तर मधेच ते हँग होत आहे. यामुळे लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. त्यांना मध्यरात्री अर्ज भरावे लागत आहेत. अंगणवाडी सेविकांना सुद्धा यामुळे रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनाने ‘नारीशक्ती’ ॲप उपलब्ध करून दिले आहे. पण मागील काही दिवसांपासून ‘नारीशक्ती’ ॲप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे. ॲप्लिकेशन वर ‘क्लिक’ करूनही कसलाच रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे नवीन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असणाऱ्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येतो. त्यासाठी सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची असून, सध्या हजारोच्या संख्येत कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे पेंडिंग आहेत. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येमुळे अंगणवाडी सेविकांनाही रात्री अपरात्री जागून काम करावे लागत आहे.

प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज

तांत्रिक अडचणींमुळे नारीशक्ती दूत हे ॲप आणी अनेकदा वेबसाईट ही दिवसभरात सुरू होत नाही. तर अनेकदा रात्रीचे आकरा, बारा वाजल्यानंतर व्यवस्थित चालते त्यामुळे अंगणवाडी सेविकांना रात्रीचे जागरण करून जितके अर्ज भरता येतील तेवढे अर्ज भरावे लागत आहेत. अंगणवाडी सेविकांना महिलांचे अर्ज भरताना ओटीपी ची गरज पडत असतल्याने अर्जदार महिलांना रात्री फोन करून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ‘ओटीपी’ मागावा लागतं आहे. हा असला त्रास सहन करत अंगणवाडी सेविकांना काम करावे लागत आहे. प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन या अडचणीवर उपाययोजना करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now