Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना यादी कुठे पाहायला मिळणार? येथे जाणून घ्या

4 Min Read
हे वाचलं का? 🤞

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana News Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यत 1 कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत. योजेसाठी अर्ज केलेल्या महिला आता लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीची (Ladki Bahin Eligibility List) प्रतिक्षा करत आहेत. लाडकी बहीण योजना पात्रता यादी मध्ये नाव आले आहे की नाही हे ऑनलाईन सोबत ऑफलाईन मार्गाने सुद्धा जाणून घेता येणार आहे. 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना (Applicant Women) आता पात्रता यादीची (Eligibility List) प्रतिक्षा लागली आहे. अर्जदार महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊया.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज मोठ्या संख्येने महिला अर्ज भरत आहेत. दररोज साधारण 50 ते 70 हजार महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. अर्जदार महिलांची संख्या 1 कोटी च्या पुढे गेली आहे. या महिलांसमोर आता त्यांचा अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्जदार महिला लाडकी बहीण योजना पात्रता यादीची प्रतिक्षा करत आहेत.

लाडकी बहीण योजना यादी कुठे पाहायला मिळणार (offline) 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिला त्यांच्या गावात पात्रता यादी पाहू शकणार आहेत. यासाठी समित्या स्थापन करून प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाडकी बहीण लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे. यामुळे अर्जदार महिलांना त्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? हे समजणार आहे. त्यामुळे ऑफलाईन मार्गे यादीत नाव आले आहे की नाही हे पाहण्यासाठी महिलांना गावातील समिती यादी वाचणा दरम्यान उपस्थित राहावे लागणार आहे.

🔴 हे वाचलं का? 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव आले नाही तर? येथे करा हरकतींची नोंद.

योजनेत झालेले मोठे बदल 

मागच्या आठवड्यात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत बदल केले होते. ते पुढीलप्रमाणे:

  • 1: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.  
  • 2: एखाद्या महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहत असलेल्या पुरूषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेच्या पतीच्या कागदपत्रांवर त्या महिलेस योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • 3: ग्रामस्तरीय समिती मार्फत प्रत्येक शनिवारी गावोगावी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन केले जाणार.
  • 4 : केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरले जाणार. पण, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात येणार.
  • 5: नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्याने त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार.

🔴 हे वाचलं का? 👉 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? 2 मिनिटात तपासा.

लाडकी बहीण योजनेचे पैसै बँकेत कधी जमा होणार? 

19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्य सरकार लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करणार आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article