Pm Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra | केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’तून मोफत वीज मिळणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमधून आपल्याला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज देण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) सुरु केली आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना या मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे. मोदी सरकार या योजनेसाठी 75,021 कोटी रुपये खर्च करणार आहे.
मोफत वीज योजना काय आहे
छतावर सौरऊर्जा संयंत्रे (रूफ टॉप सोलर) बसवण्याची ही योजना आहे. या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 30,000 रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 60,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तर 3 किलोवॅटसाठी 78000 रुपये अनुदान मिळणार आहे. आणी जे लोक आपल्या घरावर सौरउर्जा संयंत्रे बसवतील त्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.
मोफत वीज योजनेद्वारी कमी व्याजदरात कर्ज
Muft Bijli Yojana Maharashtra: तुम्ही जर या योजनेचा लाभ घेऊ इच्चीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी आपल्याला सरकार कमी व्याजात कर्ज सुद्धा देत आहे. रेपो रेटपेक्षा फक्त 0.5 % जास्त व्याज त्यासाठी द्यावा लागणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलोवॅटसाठी 18000 प्रती किलोवॅट अनुदान देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज | Muft bijli yojana maharashtra online registration
- 1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन अप्लाई फॉर रूफटॉप सोलर पर्याय निवडा.
- 2: तिथे राज्य आणि वीज वितरण कंपनीच्या नावाची निवड करा. आणी आपला ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई मेल टाक
- 3: ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉगीन करा. त्यानंतर समोर फॉर्म येईल. तो फॉर्म भरा आणि सबिमिट करा.
- 4: यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर तुम्ही DISCOM मध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडरकरुन प्लॅन्ट इंस्टॉल करु शकता.
- 5: शेवटी सोलर पॅनल इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला प्लँट डिटेल देऊन नेट मीटरसाठी अर्ज करावा लागले.