लाडकी बहिन योजनेच्या 6व्या हफ्त्याबाबत शिंदे गटाच्या नेत्यांच महत्त्वाच विधान Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment News

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना लवकरच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: The 6th installment is expected soon! Eligible women must link their Aadhaar to their bank accounts and activate DBT. Get the latest updates here).

मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार?

Majhi Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मागील पाच महिन्यांचे हप्ते सरकारने यापूर्वीच जमा केले आहेत. शिरसाट यांच्या मते, मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात या रकमेची वाढ करून ती 2100 रुपये करण्यात येईल. त्यानंतर महिलांना ही सुधारित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. 

महिलांसाठी सरकारचा सकारात्मक विचार

शिरसाट यांनी सांगितले की, ज्या महिला पात्र आहेत त्यांना नेहमीप्रमाणे हप्ते मिळत राहतील. सरकार या योजनेच्या हफ्त्याची रक्कम वाढवण्याबाबत सकारात्मक आहे. सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करणे आणि DBT सक्रिय करणे आवश्यक आहे.

2100 रुपयांच्या रक्कमेबाबत घोषणा

महायुतीच्या प्रचार सभांमध्ये यापूर्वीच पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे हे आश्वासन प्रत्यक्षात येणार का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. 

महत्त्वाची प्रक्रिया: आधार व DBT लिंकिंग

महिलांनी खात्री करावी की, त्यांचे आधार बँकेला लिंक झाले आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सक्षम आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा होईल.

सरकारची पुढील घोषणा कधी?

मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजनेशी संबंधित पुढील घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अपेक्षित आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now