डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ३००० रुपये एकत्र जमा होणार Majhi Ladki Bahin Yojana December January Payment

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana December January Payment

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana December January Payment: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ३००० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात संक्रांतीपूर्वी जमा होणार आहेत. (Under the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, ₹3000 for December and January will be deposited in beneficiaries’ accounts before Makar Sankranti. ₹1400 crore allocated for the scheme. Read more!).

‘माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत, जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे ७५०० रुपये लाभार्थींना मिळाले आहेत.  

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता:

डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ३००० रुपये एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थीं महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

फडणवीस सरकारची तरतूद:

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सरकारने या योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद जाहीर केली आहे. ही तरतूद लाभार्थीं महिलांच्या खात्यात निधी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.  

अंगणवाडी सेविकांची समस्या: 

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नोंदणीसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचे मानधन मिळाले नाही. अंगणवाडी सेविकांकडून सरकारने लवकरात लवकर त्यांचे मानधन जमा करण्याची मागणी केली जात आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now