Mukhyamantri Teerth Darshan Yojana : नवीनच घोषणा करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत. जाणून घ्या नेमकी काय आहे ही योजना…
‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’ या योजनेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर महाराष्ट्र सरकारने आता नवीन ‘Mukhyamantri Teerth Darshan Yojana’ जाहीर केली आहे. तीर्थदर्शन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 60 वर्षांवरील नागरिकांना देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान देखील दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आता ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची सुद्धा घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, अमरनाथ यात्रा इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे सर्व लोकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्राला जाण्याची सर्वांची इच्छा असते, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. राज्यातील गरीब वंचित समाजाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा’ कोणाला लाभ मिळणार?
राज्यातील सर्व धर्माचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करुन देणे हे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
🔴 हे वाचल का? 👉 शिंदे सरकारची ‘ माझा लाडका भाऊ योजना’, तरुणांना दरमहा 10 हजार.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तरतूदी काय?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट ‘अ’ आणि ‘ब’ प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात किंवा यादितील स्थळांमध्ये वाढ सुद्धा केली जाऊ शकते. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा फक्त एकदाच लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना प्रवास खर्चाची जास्तीत जास्त मर्यादा प्रती व्यक्ती तीस हजार रुपये इतकी असेल. यात प्रत्यक्ष प्रवास खर्च, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ लाभ घेण्यासाठी पात्रता?
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
- वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळेल.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी कोण अपात्र ठरणार?
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
- पण 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
- प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाणे ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.
- अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याणे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुणे नसावे).
- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही.
- अर्जदार/प्रवाशाणे खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही माहिती लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो/ती प्रवासासाठी अपात्र ठरत असेल, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.
सदर योजनेच्या ‘पात्रता’ आणि ‘अपात्रता’ निकषामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेणे बदल करण्यात येईल.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.).
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक.
- सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदाराने अर्ज भरताना स्वतः हजर राहण आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल.
.🔴 लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरायला उशीर झाला तर? अजित पवार यांनी सांगितली हकीकत.