Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Apply Online : महाराष्ट्रातील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारद्वारे (Mukhyamantri Vayoshri Yojana) मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत (CM Vayoshri Yojana) पात्र लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधने खरेदी करण्यासाठी (उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी). सरकारकडून 3000 रुपयांची आर्थिक मदत मीळेल. तसेच त्यांना त्याद्वारे केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत असलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असायला हवी व. (त्यांनी दि.31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केली असतील)
- लाभार्थ्यांचे कौंटुंबिक वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहिल.
- सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे, याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोणापत्र सादर करणे आवश्यक राहिल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- स्वयंघोषणापत्र (उत्पन्नाचे व उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसल्याचे)
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली ईतर कागदपत्रे
योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही सुरू आहे. तत्पुर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्राची पुर्तता करून आपले अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.