Navin Yojana 2024 Maharashtra : लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी नवीन योजना, कुणाला किती पैसे मिळणार?

3 Min Read
🔴आजची ताजी बातमी 🔥🤞

Navin Yojana 2024 Maharashtra : महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू होणार आहे…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरु करण्यात येणार आहे. “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. याचा जीआर राज्य शासनाकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता उज्वला योजनेतील ५२.१६ लाख लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय आणि या योजनेच्या लाभासाठी निकष काय आहेत ते जाणून घेऊया…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता प्रत्येक वर्षाला तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली आहे. या योजनेचे निकषही निश्चित करण्यात आले असून, बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. 

अन्नपूर्णा योजना पात्रता काय आहे?

  • 1: अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. 
  • 2: सध्या महाराष्ट्रातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • 3: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.
  • 4: एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) फक्त एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल.

🔴 हेही वाचा 👉 Mazi Ladki Bahin Yojana Payment Date: ‘या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता, तारीख जाहीर.

कुणाला किती पैसे मिळणार?

  • 1: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यामार्फत केले जाते. मु्ख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत ३ मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यामार्फत केले जाणार आहे. 
  • 2: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदाना शिवाय राज्य सरकारकडून ५३० रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. 
  • 3: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर ८३० रुपये किंवा जिल्ह्यानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जातील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article