New Sarkari Yojana 2025 Maharashtra: महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आणखी एक महत्वपूर्ण योजना सुरु करण्यात येत असून या योजनेचा लाभ राज्यातील घरकाम करणाऱ्या मोलकरणींना होणार आहे. (Maharashtra Government to launch a new scheme for domestic workers (molkarin) in February 2025. Eligible women will receive a household kit worth ₹10,000. Learn about eligibility and benefits).
New Government Scheme 2025: मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) घरकाम करणाऱ्या महिलांसाठी फेब्रुवारी 2025 पासून एक नवीन गृहोपयोगी साहित्य वाटप योजना सुरू करणार आहे. यामध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक कुकरसह 21 प्रकारची भांडी देण्यात येणार आहेत. या साहित्याची एकूण किंमत अंदाजे 10,000 रुपये असेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजना दरमहा ₹2,100 वाढीबाबत सीएम फडणवीस यांची महत्वाची घोषणा.
योजनेसाठी पात्रता आणि लाभ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही योजना फक्त नोंदणीकृत घरगुती कामगार-मोलकरणींसाठी लागू असेल. राज्यातील 10 ते 12 लाख घरगुती कामगार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
🔴 हेही वाचा 👉 पुढचा हप्ता कधी येणार? पात्रतेसंदर्भात मोठा निर्णय.
योजनेचा हेतू आणि प्रेरणा
घरगुती कामगार-मोलकरणींसाठी सुरु करण्यात येत असलेली ही योजना महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी लागू असलेल्या साहित्य वाटप योजनेच्या धर्तीवर आखली गेली आहे. महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांचे जीवन सुसह्य करणे, हा सरकारचा उद्देश आहे.
लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्यासोबतच या नवीन योजनेबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये या योजनेसाठीच्या अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिनींच्या पडताळणीसाठी 50,000 योजनादूत सज्ज.