‘माझी लाडकी बहिण’ नंतर महिन्याला 10,000 रुपये देणारी नवीन योजना: काय आहे ही योजना?

3 Min Read
New Sarkari Yojana Maharashtra 2024 In Marathi

Navin Yojana 2024 Maharashtra Sarkar In Marathi: महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला विधवा आणि घटस्फोटित महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. याशिवाय, आणखी एका योजनेतून एका घटकास ‘महिन्याला 10,000 रुपये’ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Sarkari Yojana Maharashtra 2024 New: विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ आहे. मध्यप्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सुरु केलेल्या ‘लाडली बहन’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना जाहीर केली. माझी लाडकी बहिण योजनेद्वारे 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला विधवा आणि घटस्फोटित महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे, आणखी एका योजनेतून महिन्याला 10,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

लेक लाडकी योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी पूर्वीपासूनच अनेक योजना सुरु केल्या आहेत. नव्याने सुरु झालेल्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेपूर्वी सरकारने ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षांपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्याची योजना आहे. (पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो).

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना

सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेप्रमाणेच आणखी एक योजना जाहीर केली आहे – ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’. घरगुती वापरासाठी एलपीजी गॅसचा वापर वाढावा यासाठी, गॅस सिलेंडर खरेदी करणे प्रत्येक कुटुंबाला परवडावे यासाठी, वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ही योजना आहे. 

लखपती दिदी योजना

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 6 लाख 48 हजार महिला बचत गट कार्यरत आहेत. ही संख्या वाढवून 7 लाख करण्यात येणार आहे. आणि बचत गटांसाठी देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरून सरकारने 30 हजार रुपये इतकी वाढ केली आहे. महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ तसेच प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’ बनल्या आहेत. यंदाच्या वर्षात 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये देणारी योजना

अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण’ या योजनेची घोषणाही केली आहे. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमधून वर्षाला सुमारे 11 लाख विद्यार्थी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात. पण या विद्यार्थ्यांना पुढे नोकरी मिळत नाही. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी मिळते. यासाठी दरवर्षी 10 लाख तरुण तरूणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठीची मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे. यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षाला 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article