NPS Vatsalya Yojana Maharashtra : नुकतेच 18 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजना सुरू केल्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यादरम्यान निर्मला सीतारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणुकीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला असल्याची माहिती दिली. एनपीएस वात्सल्य योजना लहान मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे. (Discover the benefits of the NPS Vatsalya Yojana launched by the government to secure your child’s future with minimal investment. Learn more about eligibility and investment options).
प्रत्येक पालकास आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर NPS वात्सल्य योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. NPS वात्सल्य योजनेत उघडलेले मुलांचे खाते परिपक्व झाल्यावर ते NPS खात्यात रूपांतरित होते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊन NPS वात्सल्य योजनेत खाते उघडू शकता. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…
तुम्ही NPS वात्सल्य योजनेत किमान रु. 1,000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. यामुळेच या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही मुलांसाठी मोठी रक्कम साठवू शकता. NPS वात्सल्य योजनेत तुम्हाला 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी मिळतो.
गुंतवणुकीदरम्यान, तुम्ही अभ्यास, कोणत्याही गंभीर आजारावरील उपचार यासाठी योजनेतून जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम काढू शकता. NPS वात्सल्य योजनेतून फक्त तीन वेळा पैसे काढता येतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.