Pan Card: पॅन कार्ड हरवले तर घरबसल्या मागवा डुप्लिकेट पॅन कार्ड, जाणून घ्या डुप्लिकेट पॅन कार्ड कसे बनवायचे

2 Min Read
Pan Card Duplicate Apply Online Guide Marathi

How to Make Duplicate Pan Card | डुप्लिकेट पॅन कार्ड कसे बनवायचे:  तुमच्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे असतील, त्यापैकी काहींची कधीतरी गरज भासेल, तर अशी अनेक कागदपत्रे आहेत, ज्यांच्या अनुपस्थितीत जवळपास प्रत्येक काम अडकू शकते.  उदाहरणार्थ,

आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड चा वापर ओळखपत्राइतकाच मर्यादित नसून सरकारी, बँकिंग तसेच निमसरकारी कामांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड अवशयक आहे. आधार कार्डाप्रमाणेच पॅन कार्ड सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. जर काही कारणास्तव तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही ते पुन्हा बनवू शकता म्हणजेच तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड बनवू शकता. पॅन कार्ड हरवल्यास डुप्लिकेट पॅन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेऊयात…

डुप्लिकेट पॅन कार्ड कसे बनवायचे:

Duplicate Pan Card  Apply Online: तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड बनवू शकता. डुप्लिकेट पॅन कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा- 

  • 2: येथे तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. (तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक, 10 अंकी आधार क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादी माहिती भरावी लागेल).
  • 3: तुम्हाला GSTN क्रमांक असे लिहलेले दिसेल,जे तुम्हाला सोडायचे आहे. 
  • 4: त्यानंतर TआणिC (T&C) वर क्लिक करा.
  • 5: तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल, तो भरा.
  • 6: आणी सबमिट वर क्लिक करा.
  • 7: येथे तुमच्या स्क्रीनवर तुमच्या पॅन कार्डची माहिती दिसू लागेल.
  • 8: आता, तुम्हाला ज्या पत्त्यावर डुप्लिकेट पॅन कार्ड मागवायचे आहे, त्या पत्त्याचा पिन कोड टाका.
  • 8: त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर मिळालेला OTP भरून तुमच्या पत्त्याची पडताळणी करा.
  • 9: आता तुम्हाला 50 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल ते करून त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • 10: पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॅन कार्डच्या वेबसाइटवर एक स्लिप मिळेल, ती जपून ठेवा झालं. काही दिवसांतच तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोच होईल.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट पॅन कार्ड मागवू शकता.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now