How to apply for PAN card online in Maharashtra 2024: पॅन कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, अशा ईतर अनेक कारणांसाठी आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते. तुम्ही जर अजून पॅन कार्ड काढले नसेल तर ते काढण्यासाठी आता तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. पॅन कार्ड काढणे आता अगदी सोपे झाले आहे. तुम्ही आता घरबसल्या पॅन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
येथे आम्ही तुम्हाला पॅन कार्ड मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणी पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे सांगणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, त्यामुळे तुम्हाला पॅन करडसाठी ऑनलाइन अर्ज करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
पॅन कार्ड ऑनलाइन अर्जासाठी अर्ज शुल्क
तुम्ही स्वतः पॅन कार्डसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला भारतीय पत्त्यासाठी 107 रुपये पॅन अर्ज शुल्क भरावे लागेल. आणी परदेशी पत्त्यासाठी पॅन शुल्क 1017 रुपये आहे. तुम्ही ‘NSDL-PAN’, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फी भरू शकता याशिवाय तुम्ही इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटवर विनामूल्य ई-पॅन मिळवू शकता.
पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
आयकराच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. या पोर्टलवरून तत्काळ ई-पॅन विनामूल्य अर्ज करता येतो, परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे आधीपासून पॅन कार्ड नसणे आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. पण हे जाणून घ्या की तात्काळ ई-पॅन फक्त डिजिटल स्वरूपातच वापरता येते. तुम्हाला फिजिकल पॅनकार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला NSDL किंवा UTIITSL वेबसाइटद्वारे अर्ज करावा लागेल.
आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
- 1: सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग पोर्टल incometaxindiaefiling.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- 2: पोर्टलच्या मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर, “Get New e-PAN” या पर्यायावर क्लिक करा.
- 3: क्लिक केल्यानंतर, नवीन ई-पॅन मिळवा पृष्ठावर तुमचा आधार क्रमांक टाका, आय कन्फर्म द चेकबॉक्सवर क्लिक करा.
- 4: यानंतर, OTP वेरिफिकेशन पेज येईल, यामध्ये तुम्हाला “I Have Read the Consent Terms and Agree To Proceed Further” या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि “Continue” वर क्लिक करावे लागेल.
- 5: आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकून वेरिफाय करा.
- 6: आता UIDAI सोबत आधार तपशील प्रमाणित करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा.
- 7: त्यानंतर व्हॅलिडेट आधार तपशील पेज येईल, I Accept that checkbox वर क्लिक करा.
- 8: वरील स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल, तो सेव्ह करून ठेवा.
- :9: आता तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल.,
अशा प्रकारे तुमची ऑनलाइन पॅन कार्ड अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
NSDL पोर्टलवरून पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
- 1: नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाइट https://nsdl.co.in/ वर जा.
- 2: तेथे मुख्य पृष्ठावर अर्जाचा प्रकार निवडा : भारतीय नागरिक/परदेशी नागरिक, नवीन पॅन किंवा विद्यमान पॅन डेटामध्ये बदल/अपडेट, यानंतर व्यक्ती, ट्रस्ट, संस्था, फर्म इत्यादींमधून तुमची श्रेणी निवडा.
- 3: निवडल्यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.
- 4: त्यानंतर हा फॉर्म सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल.
- 5: येथे “कंटिन्यू विथ द पॅन ऍप्लिकेशन फॉर्म” बटणावर क्लिक करा.
- 6: त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल, तुमचे डिजिटल ई-केवायसी येथे सबमिट करा आणि तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे आहे की नाही ते सांगा.
- 7: त्यानंतर आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक टाकून फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा.
- 8: यानंतर, तुमचा क्षेत्र कोड, AO प्रकार आणि इतर माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
- 9: यानंतर, पॅन कार्ड अर्ज सबमिट करा आणि पेमेंट विभागात जाऊन फी भरा.
- 10: पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट स्लिप मिळेल, आता Continue वर क्लिक करा, आधार प्रमाणीकरणासाठीच्या घोषणेवर टिक करा आणि Authenticate चा पर्याय निवडा.
- 11: आता Continue with e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा आणि आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला OTP ऑथेंटिकेट करा.
- 12: नंतर सबमिट वर क्लिक करा आणि ई-साइनसह सुरू ठेवा हा पर्याय निवडा.
- 13: नंतर 12 अंकी आधार क्रमांक टाकून पुन्हा OTP व्हेरिफाय करा.
आता तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल, ती PDF फाईलमध्ये असेल ज्याचा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल, जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये असेल.
UTIITSL पोर्टलवरून पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
- 1: सर्व प्रथम, UTIITSL च्या अधिकृत वेबसाइट https://www.utiitsl.com/ वर जा आणि पॅन सेवांवर जा आणि “भारतीय नागरिक/एनआरआयसाठी पॅन कार्ड” निवडा.
- 2: नंतर नवीन पेजमध्ये “Apply for New PAN Card (फॉर्म 49A)” पर्यायावर क्लिक करा.
- 3: त्यानंतर भौतिक किंवा डिजिटल मोड निवडा.
- 4: निवड केल्यानंतर, एक अर्ज उघडेल, तो भरा.
- 5: नंतर भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि सबमिट करा.
- 6: यानंतर, OTP वेरिफिकेशन करून पुढे जा आणि उपलब्ध पेमेंट गेटवे पर्यायांपैकी कोणताही एक निवडून ऑनलाइन शुल्क भरा.
- 7: आता तुम्हाला एक स्लिप मिळेल, ती सेव्ह करा आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.
- 8: दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह प्रिंट आउटवर तुमची स्वाक्षरी करा आणि नंतर इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पूर्णपणे भरलेला अर्ज अपलोड करा आणि तो ऑनलाइन अपलोड करा.
- 9: ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर, पॅन कार्डसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जवळच्या UTIITSL कार्यालयात जमा करा.
अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.