Pm Awas Yojana Maharashtra Online Registration: घर बांधण्यासाठी मिळतील 1 लाख 20 हजार रुपये, असा करा ऑनलाइन अर्ज

3 Min Read
Pm Awas Yojana Maharashtra Online Registration 2024

Pm Awas Yojana Maharashtra Online Registration : केंद्र सरकारने PM आवास योजनेचे लक्ष्य 2027 पर्यंत वाढवल्याने (Pm Awas Yojana) PM आवास योजना सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेॅतर्गत पात्र कुटुंबांना पक्की घरे बांधून दिली जातात. आता या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

PM आवास योजनेत झालेल्या नवीन बदलानुसार, ज्या कुटुंबाना आता पक्क्या घरासाठी अर्ज करायचा आहे ते थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

पीएम आवास योजना ऑनलाईन नोंदणी 

Pm Awas Yojana 2024 Maharashtra Online Registration:

पंतप्रधान आवास योजनेच्या मागील टप्प्यांमध्ये, लोकांनी कायमस्वरूपी घराच्या सुविधेसाठी ऑफलाइन अर्ज केले होते, जे ग्रामपंचायत आणि सचिवांमार्फत पूर्ण झाले होते. या ऑफलाइन प्रक्रियेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. महत्वाचे म्हणजे पक्क्या घरासाठी अर्ज करूनही अनेक लोक सुविधेपासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळेच आता पी एम आवास योजनेमार्फत घर मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

ज्यांनी पूर्वीच्या टप्प्यात अर्ज केले होते परंतु त्यांना अजूनही पक्की घरे बांधून मिळाली नाहीत ते आता पुन्हा ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्याने यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप होणार नाही आणि तुम्ही तुमचा अर्ज थेट केंद्र सरकारकडे सबमिट करू शकाल. त्यामुळेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता कोणाच्याही माध्यस्थीची गरज भासणार नाही.

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर

पीएम आवास योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा लाभ

  • 1: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे, कोणत्याही कर्मचाऱ्यांची, मध्यस्थीची गरज भासणार नाही आणि तुम्ही तुमचा अर्ज थेट सरकारकडे पाठवू शकाल.
  • 2: अर्जाची संपूर्ण प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर केली जाते आणि तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीएम आवास योजनेचा अर्ज भरू शकता.
  • 3: ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून तुम्ही फक्त 5 मिनिटांत अर्ज करू शकता.
  • 4: पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी धावपळ करण्याची आता गरज नाही.

कसा मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा हप्ता

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत, ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांच्या खात्यात योजनेची संपूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाते. केंद्र सरकार ही रक्कम चार हप्त्यांमध्ये देते जेणेकरून लोकांना त्यांच्या घरांचे बांधकाम हळूहळू पूर्ण करता येईल आणि पैसा इतरत्र कुठेही खर्च होऊ नये. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ६ महिन्यांत घर बांधून पूर्ण होते.

पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया?

  • 1: पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, पीएम आवास योजनेच्या पोर्टलला भेट द्या.  पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर नोंदणी करा वर क्लिक करा.
  • 2:  “नोंदणी” वर क्लिक करताच, तुमच्या स्क्रीनवर गृहनिर्माण योजनेचा अर्ज उघडेल.
  • 3: अर्जामध्ये गृहनिर्माण योजनेशी संबंधित विचारलेली माहिती व्यवस्थित भरा. आणी, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • 4: कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज पडताळणीसाठी पाठवा.

तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, जाहीर करण्यात येणाऱ्या पुढच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव येईल.

*पीएम आवास योजनेच्या लाभार्थी नावांची यादी जाहीर होताच, तुमच्या मोबाईलवर त्याचे अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईज जरा”.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article