Free Tablet Yojana : काय आहे मोफत टॅब्लेट योजना? सरकारने सांगितली या योजनेची हकीकत

2 Min Read
Pm Free Tablet Yojana Maharashtra Fake Sarkari Yojana Alert

Fake Sarkari Yojana Alert: Free Tablet Yojana: ‘मोफत टॅब्लेट योजना’ या योजनेची सोशल मीडियावार खूप चर्चा सुरु आहे. ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारी विध्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप करत असल्याचा दावा अनेक पोस्टमधून केला जात आहे. 

केंद्र सरकार मोफत टॅब्लेट योजना (Free Tablet Yojana) या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देत आहे. असा दावा अनेक पोस्टमध्ये केला जातो आहे. पण सरकारकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार मोफत टॅब्लेट योजना अशी कोणतीही सरकारी योजना सुरु करण्यात आलेली नाही. सरकारने स्पष्ट केले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

वास्तविक, खरा प्रकार असा आहे. काही लोक लोकांना लुबाडण्यासाठी लोकांची वैयक्तिक आणि बँक माहिती मिळविण्यासाठी सतत काही ना काही शक्कल लढवत असतात. हे त्यातलेच लोक आहेत, जे आधी लोकांना बँक अधिकारी असल्याचे सांगून लोकांकडून त्यांच्या फोनवर आलेला OTP मागून बँक खाते साफ करायचे. तर कधी लोकांना ‘KBC’ मध्ये 25 लाख जिंकल्याचे अमिश दाखवणारे मेसेज पाठवायचे आणी लोकांकडून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याच्या चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळायचे. पीआयबीने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा कुठेही दिसणाऱ्या मोफत टॅबलेट योजने संदर्भातील पोस्टवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. (free tablet yojana maharashtra 2024 is fake).

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर PIB ने लिहिले आहे, “भारत सरकारच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या मोफत टॅबलेट योजनेमुळे तुमचीही दिशाभूल होत आहे का? ही योजना खोटी आहे. अशा कोणत्याही मोफत योजनेला बळी पडू नका. देशातील काही राज्यांनी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप केले आहे, हे विशेष. परंतु, केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही किंवा तशी कोणतीही योजना विचाराधीन नाही.

मोफत टॅबलेट योजनेचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरात प्रचार केला जात आहे. केंद्र सरकार मोफत टॅबलेटचे वाटप करणार असल्याचा दावा अनेक पोस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर लोकांकडून त्यांची सर्व कागदपत्रेही देण्यास सांगितले जात आहे. लोकांची दिशाभूल करून लोकांकडून त्यांची बँक खात्याची माहिती मिळवणे हा या लोकांचा उद्देश आहे.

‘मोफत टॅबलेट योजना’ ही योजना खोटी आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरु करण्यात आलेली नाही.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article