Pm Kisan 18th Installment Date: भारत सरकार दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत करोडो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये PM किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा करते. PM किसान योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता दिला जातो अशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये सरकारकडून दिले जातात. आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले असून त्याअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, ज्याचा लाभ कोट्यवधी होणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की अशा काही चुका आहेत ज्यामुळे तुमचा PM किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचा पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता अडकू शकतो…
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही योजनेच्या लाभासाठी भरलेली माहिती चुकीची असल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे झाल्यास नियमानुसार तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी, तुम्हाला ही चुकीची माहिती आधी दुरुस्त करावी लागेल.
जर तुम्ही भरलेली बँक खात्याबद्दलची माहिती चुकीची असेल तर तुम्हाला ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल. तसेच आधार कार्डची माहिती किंवा आधार क्रमांक चुकीचा टाकल्यास इ. अशा परिस्थितीतही, तुम्हाला ती माहिती दुरुस्त करावी लागेल, ज्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट देऊ शकता. आणी चुकीची माहिती दुरुस्त करू शकता.
त्याचबरोबर पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही तरी ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे वेळेत ई-केवायसी पूर्ण करा म्हणजे तुम्हाला 18 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल.
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर त्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. जिथे तुम्ही e-KYC च्या पर्यायावर क्लिक करून ई-केवायसी करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करून घेऊ शकता.