Pm Kisan Yojana News Today : महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता.. त्याचप्रमाणे, भारत सरकार देखील अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवते, ज्याचा लाभ सध्या मोठ्या संख्येने लोक घेत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश आहे, त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 6 हजार रुपये पाठवून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आता 18 वा हफ्ता मिळणार आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही? अशा परिस्थितीत तुमचा या यादीत समावेश आहे का हे तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरते. कोणत्या शेतकऱ्यांना pm किसान योजना 18 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही याबाबत जाणून घेऊया…
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 18 व्या हफ्त्याचा लाभ
- 1: ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असूनही योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचा हप्ता अडकू शकतो. विभागाकडून अशा शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांचे अर्ज रद्द करण्यात येत असून आवश्यकता भासल्यास नोटिसाही बजावल्या जात आहेत. त्यामुळे, जर तुम्ही चुकीचा अर्ज केला असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
- 2: पीएम किसान योजनेंतर्गत, जमिनीची पडताळणी न करणाऱ्या शेतकऱ्यांचे हप्तेही अडकू शकतात. नियमांनुसार, जर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ हवा असेल तर तुम्हाला जमिनीची पडताळणी करणे बंधनकारक आहे.
- 3: पीएम किसान या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही ते 18 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. नियमांनुसार, जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेले असले पाहिजे. तसे न केल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
- 4: जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळवू इच्छित असाल, तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेऊ शकता, बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. म्हणजेच तुम्हाला pm किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.