याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा केले जाऊ शकतात 2000 रुपये PM Kisan Yojana 19th Installment Date

3 Min Read
PM Kisan Yojana 19th Installment Date 2000 RS Farmers Benefit

PM Kisan Yojana 19th Installment Date : सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांतर्गत विविध प्रकारचे फायदे दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. (Farmers may receive Rs 2000 from the PM Kisan Yojana 19th installment this month. Discover eligibility details, potential restrictions, and the expected release date in January 2024).

PM Kisan Yojana 19 Va Hafta : देशात शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सरकारी योजना राबवल्या जात आहेत, त्यापैकी काही राज्य सरकार चालवते. तर अनेक योजना केंद्र सरकार चालवते. यतीलच एक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नावाची एक योजना आहे, ज्या अंतर्गत भारत सरकार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत एकूण 18 हप्ते देण्यात आले असून आता या योजनेतील पात्र शेतकरी 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, परंतु असे काही शेतकरी आहेत, जे या योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

19 वा हप्ता कोणत्या महिन्यात जारी केला जाऊ शकतो?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. या योजनेचा प्रत्येक हप्त 4 महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो आणि त्यानुसार, 19 वा हप्ता जारी करण्याचा महिना जानेवारी आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात, मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे शेतकरी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हफ्त्यापासून वंचित राहू शकतात

  • चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार असून त्यांना पुढच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले नाही ते पुढच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील.
  • ई-केवायसी न केलेले शेतकरी 19 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करा. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करून घेऊ शकता, परंतु जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत त्यांचे हप्ते अडकू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी केलेली नाही, त्यांचाही हप्ता अडकू शकतो. हे काम न केलेल्या शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल.
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now