PM Kisan Yojana 2025 New Rules : पीएम किसान योजनेचे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम

2 Min Read
PM Kisan Yojana 2025 New Rules

PM Kisan Yojana 2025 New Rules : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला मिळणार आहे. पती-पत्नी किंवा त्यांच्या १८ वर्षे वयाच्या मुलांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच, नवीन शेतजमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही योजना बंद करण्यात आली आहे. (Learn about the new rules of PM Kisan Yojana 2025. Now only one family member will benefit, based on inheritance. Check eligibility, required documents, and detailed application process for PM Kisan and Namo Samman Nidhi Yojana).

PM Kisan Yojana 2025 नवीन नियम काय आहेत?

  1. वारसा हक्काने लाभ:
    लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनाच वारस हक्काच्या नोंदीनुसार हा लाभ मिळेल.
  2. नवीन शेतजमीनसाठी योजना बंद:
    १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल.
  3. नियमित शेतजमीन धारकांसाठी आवश्यक कागदपत्र:
  • ७/१२ व ८अ उतारे
  • आधार कार्ड
  • फेरफार उतारा
  • वारस हक्काच्या नोंदीचे प्रमाणपत्र
  1. नोकरीधारक आणि करदात्यांसाठी योजना बंद:
    सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणारे आणि करदाता असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Namo Samman Nidhi Yojana 2025 (नमो सन्मान) योजनाही अशाच नियमांखाली
महाराष्ट्र शासनाच्या ‘नमो सन्मान’ योजनेचे नियम पीएम किसान योजनेप्रमाणेच आहेत. त्यामुळे पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच नमो सन्मान योजनेंतर्गत मदत मिळेल.

योजनेचे उद्दिष्ट


पीएम किसान योजनेतील बदलांमुळे लाभ फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. तसेच, गैरप्रकार टाळण्यासाठी ही योजना अधिक पारदर्शक केली जात आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी अद्ययावत ठेवून आवश्यक कागदपत्रांसह लवकर अर्ज करावा, अशी सूचना सरकारने केली आहे.

महत्त्वाची लिंक:


पीएम किसान योजना अर्जासाठी अधिकृत वेबसाइट.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now