Pm Shram Yogi Mandhan Yojana : प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा? येथे जाणून घ्या

2 Min Read
Pm Shram Yogi Mandhan Yojana How To Apply Online Information 2024

Pm Shram Yogi Mandhan Yojana Apply Online Information | प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024: सरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी असणारी एक म्हणजे ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’. या योजनेद्वारे सरकारकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन दिली जाते. श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण आज जाणून घेणार आहोत.

Pm Shram Yogi Mandhan या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये मासिक पेन्शन देते.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता

  • 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे लेबर कार्ड असणे आवश्यक आहे. 
  • 2. या योजनेसाठी केवळ असंघटित क्षेत्रातील कामगारच अर्ज करू शकतात. 
  • 3. जर एखाद्या मजुराचा NPS, ESIC किंवा EPF कापला असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 
  • 4. पेन्शनची रक्कम मिळविण्यासाठी, लाभार्थ्याला 18 वर्षे ते 40 वर्षांच्या दरम्यान या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. 
  • 5. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक वेतन 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. 
  • 6. जर अर्जदाराने या योजनेसाठी आधीच अर्ज केला असेल आणि काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या कुटुंबाला पेन्शन रकमेच्या 50% रक्कम दिली जाईल. 
  • 7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता विहित केलेली नाही. 
  • 8. जे अर्जदार इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • 1. आधार कार्ड 
  • 2. ओळखपत्र 
  • 3. बँक खाते पासबुक 
  • 4. लेबर कार्ड 
  • 5. मोबाईल क्रमांक 
  • 6. पासपोर्ट आकाराचा फोटो

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

  • 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या सर्व कागदपत्रांसह जवळच्या लोकसेवा केंद्रात जावे लागेल. 
  • 2. यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे CSC अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील. 
  • 3. त्यानंतर CSC अधिकारी तुमचा फॉर्म भरेल आणि तुम्हाला फॉर्मची प्रिंटआउट देईल. 
  • 4. फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला जपून ठेवावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article