PM Surya Ghar Yojana: भारत सरकारने पर्यावरणपूरक उर्जा वापराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या घरांवर सोलर पॅनल लावण्यासाठी आर्थिक सहाय्य (Subsidy) दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. (Apply for PM Surya Ghar Yojana and get subsidies for installing solar panels. Benefits include ₹30,000-₹1,08,000 subsidy and 300 units of free electricity. Know the process now!).
PM Surya Ghar योजनेचे फायदे:
- सबसिडी:
– 1 किलोवॅट सोलर पॅनलसाठी ₹30,000 सबसिडी.
– 2 किलोवॅटसाठी ₹60,000 तर 3 किलोवॅटसाठी ₹1,08,000 सबसिडी मिळते.
- मोफत वीज:
– या योजनेच्या लाभार्थ्यांना 300 युनिट वीज मोफत दिली जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.pmsuryaghar.gov.in/ जा.
- तुमची सर्व माहिती भरून अर्ज सादर करा.
- तुमचा अर्ज मंजुर झाल्यानंतर तुम्हाला सोलर पॅनल लावता येईल व सबसिडीचा लाभ मिळेल.
PM Surya Ghar योजनेसाठी कोण पात्र आहे?
- ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा कमी आहे.
- स्वतःच्या नावावर घर असलेले नागरिक.
सोलर पॅनलचे फायदे:
सोलर पॅनल लावल्यामुळे वीज बिल भरण्यापासून मुक्ती मिळेल, 300 युनिट वीज मोफत मिळेल, आणि पर्यावरणाला मदत होईल. आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या!