हे आहेत 2024 मध्ये विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी, येथे तपासा पात्र लोकांची यादी PM Vishwakarma Yojana

2 Min Read
Pm Vishwakarma Yojana 2024 Beneficiaries List

PM Vishwakarma Yojana 2024 : भारत सरकारद्वारे अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजना राबवण्याचा उद्देश गरजू लोकांना लाभ मिळवून देणे हा आहे, ज्यासाठी सरकार या योजनांवर भरपूर पैसा खर्च करते. जर तुम्हीही एखाद्या सरकारी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. आज आपण येथे पिएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत. या पात्रता यादीत तुमचाही समावेश होत असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. (Check the list of eligible beneficiaries for the PM Vishwakarma Yojana 2024. Find out if you qualify for financial assistance, training, and other benefits under this scheme).

पिएम विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र आहात की नाही ते जाणून घेण्यासाठी खालील पात्रता यादी तपासा, यात तुमचा समावेश होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र मानले जाल.

Beneficiaries of PM Vishwakarma Yojana
टोपली/चटई/झाडू बनवणारे
गवंडिकाम करणारे
बोट बांधणारे
लोहारकाम करणारे
लॉकस्मिथ
शस्त्रनिर्माते
हार बनवणारे
न्हावीकाम करणारे
हातोडा आणि टूलकिट बनवणारे
चांबारकाम करणारे
फिशिंग नेट बनवणारे
शिल्पकार
दगड कोरणारे
सोनारकाम करणारे
बाहुली खेळणी बनवणारे
धोबीकाम करणारे
टेलरिंगचे काम करणारे

जर तुम्ही या पात्रता यादीमध्ये असाल तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही स्वतःची नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

लाभार्थ्यांना काय लाभ मिळतो

  • लाभार्थ्यांना काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण सुरू असेपर्यंत त्यांना दररोज 500 रुपये मानधन दिले जाते.
  • टूलकिट खरेदीसाठी 15 हजार रुपये दिले जातात.
  • प्रथम 1 लाख आणि नंतर 2 लाख रुपयांचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय आणि अतिशय कमी व्याजदरात दिले जाते.
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now