PM Vishwakarma Yojana 2024 Loan: सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत ज्यात सामील होऊन सध्या लोक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. यतीलच केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू केलेली पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नावाची एक योजना आहे ज्या योजनेचा सध्या लोक खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जर तुम्ही या योजनेत सामील झालात तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देखील दिला जातो. पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे या योजनेतून मिळणारे कर्ज.
पीएम विश्वकर्मा योजनेत सामील झाल्यानंतर आर्थिक लाभांव्यतिरिक्त, तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते, परंतु तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि त्यासाठी अटी काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
पीएम विश्वकर्मा योजनेतून किती रुपये कर्ज मिळते?
- – विश्वकर्मा योजना कर्जाची रक्कम : जर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत सामील झालात तर या योजनेतून ईतर अनेक फायद्यांव्यतिरिक्त तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते. या योजनेमधून तुम्ही एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
- – योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करणारे लाभार्थी एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र असतील.
- – ज्यांनी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेडही केली असल्यास त्यांना 2 लाख रुपयांचे अतिरिक्त कर्ज मिळते.
यासाठी एक अट अशी आहे की, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला डिजिटल व्यवहारांचा अवलंब करणे बंधनकारक आहे. तरच तुम्ही कर्ज घेऊ शकता.
पीएम विश्वकर्मा योजनेतून कर्ज कसे मिळवायचे?
- 1: जर तुम्ही पात्र असाल तर प्रथम तुम्हाला 1 लाख रुपयांचे कर्ज मीळेल ज्याची तुम्हाला 18 महिन्यांत परतफेड करावी लागेल.
- 2: पहिल्या 1 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयांचे कर्ज मीळेल याचा कालावधी 30 महिन्यांचा असेल.
- 3: यासाठी फक्त 5% दराने व्याज द्यावे लागेल. आणी हे कर्ज तुम्हाला कोणतेही तारण न देता मीळेल.
पीएम विश्वकर्मा योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी येथे संपर्क करा
जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेतून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही योजनेच्या अधिकृत हेल्पलाइन 18002677777 वर कॉल करू शकता. किंवा योजनेच्या अधिकृत ईमेल pm-vishwakarma@dcmsme.gov.in वर देखील संपर्क साधू शकता.