Vishwakarma Yojana in Marathi : सरकारद्वारे विविध प्रकारच्या फायदेशीर योजना राबवल्या जातात. नवीन सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार या योजनांवर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीसाठी पैसाही खर्च करते. एखादी नवीन योजना सुरू झाल्यावर लोकांना त्या योजनेबद्दल माहिती दिली जाते. जशी की पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना. सध्या शहरी तसेच दुर्गम खेड्यात राहणारे लोकही या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जर तुम्हालाही या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर प्रथम ही योजना काय आहे? या योजनेचा कुणाला लाभ मिळतो? आणी या योजनेतून कोणते फायदे मिळतात त्याबद्दल जाणून घ्या. चला तर मग जाणून घेऊयात पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल…
काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेचा उद्देश लोकांना त्यांच्या कामात अधिक चांगले बनवणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
सोन्याचे दागिने बनवणारे, मिठाई बनवणारे, चपला शिवणारे, लाकडी वस्तू बनवणारे, कपडे शिवणारे, मातीच्या मूर्ती बनवणारे आणि असे इतर अनेक पारंपरिक व्यवसाय करणारे लोक पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे काय फायदे मिळतात?
पीएम विश्वकर्मा योजनेत सामील झालेल्या लोकांना काही दिवसांसाठी प्रगत प्रशिक्षण दिले जाते. यासाठी तुम्हाला दररोज 500 रुपये स्टायपेंड दिले जाते.
टूलकिट खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना 15000 रुपये दिले जातात.
तसेच तुम्हाला सुरुवातीला 1 लाख आणि नंतर 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते आणि तेही अगदी कमी व्याजदरात आणि कोणत्याही हमीशिवाय.