तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळू शकतो का? जाणून घ्या काय आहे PM Vishwakarma Yojana

2 Min Read
Pm Vishwakarma Yojana Benefits Eligibility And Advantages (फोटो: सोशल मीडिया)

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana: राज्य सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांप्रमाणेच केंद्र सरकारही अनेक प्रकारच्या योजना राबवते. त्यातीलच एक केंद्र सरकारी योजना आहे जी भारत सरकारने गेल्या वर्षी सुरू केली होती आणि त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना. या योजनेद्वारे 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना लाभ दिला जातो. सध्या या योजनेचा लोक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो की नाही हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहित नसेल, तर जाणून घ्या तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळू शकतो का?…

काया आहे PM विश्वकर्मा योजना 

  •  PM विश्वकर्मा योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते
  • या योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना लाभ दिला जातो
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ व कौशल्य प्रशिक्षण इ. दिले जाते

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

PM विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

हे लोक PM विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात :

  • सोनारकाम करणारे
  • लॉकस्मिथ
  • धोबीकाम करणारे
  • न्हावीकाम करणारे
  • लोहारकाम करणारे 
  • दगडाचे कोरीव काम करणारे
  • मासेमारीचे जाळे तयार करणारे
  • टोपल्या/चटई/झाडू बनवनारे
  • बोट बांधणारे
  • दगड फोडन्याचे काम करणारे
  • चपला शिवण्याचे काम करणारे
  • शिंपी काम करणारे
  • बाहुली आणि खेळणी बनवणारे 
  • शिल्पकार
  • गवंडी काम करणारे

PM विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारे फायदे?

  • जर तुम्ह PM विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला काही दिवस प्रशिक्षण दिले जाते आणि त्यासाठी तुम्हाला दररोज 500 रुपये मानधन दिले जातात.
  • तसेच टूलकिट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये दिले जातात.
  • तसेच तुम्हाला प्रथम एक लाख रुपये आणि नंतर दोन लाख रुपये कोणत्याही हमीशिवाय आणि अतिशय कमी व्याजदराने कर्ज दिले जाते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article