Alert for Bank Account Holders of PNB Bank : पंजाब नॅशनल बँक (PNB) ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर एक संदेश जारी केला आहे. त्यानुसार संबंधित खातेधरकांनी त्वरित कारवाई न केल्यास त्यांची खाती बंद करण्यात येणार आहेत…
जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या संदेशानुसार ज्या खातेधारकांच्या बँक खात्यात गेल्या दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यांच्या खात्यात शिल्लक शून्य आहे अशा खातेधाराकांना बँकेने नुकताचं एक इशारा दिला आहे.
बँकेने काय इशारा दिला आहे?
पंजाब नॅशनल बँकेने खातेधारकांच्या सांगितले आहे की जर त्यांच्या खात्यात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झाला नसेल तर त्यांची खाती निष्क्रिय होतील.
बँकेने त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक महत्त्वाची सूचना शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, “महत्त्वाची सूचना, दोन वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास, खाते निष्क्रिय होईल. कृपया तुमच्या खात्यात व्यवहार करा.”.
वापरात नसलेल्या खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी PNB कडून हे पाऊल उचलण्यात येत आहे.
कोणती खाती बंद होणार नाहीत?
पीएनबीने सांगितले आहे की काही विशिष्ट प्रकारची खाती कोणत्याही सूचनेशिवाय बंद केली जाणार नाहीत. यामध्ये खालील बँक खाती समाविष्ट आहे:
- – डिमॅट खात्यांशी लिंक असणारी खाती.
- – विद्यार्थ्यांची खाती.
- – अल्पवयीन मुलांचे खाते.
- – सरकारी योजनांतर्गत उघडलेली खाती. (जसे की सुकन्या समृद्धी योजना (SSY), अटल पेन्शन योजना (APY) ई…
तुमचे खाते निष्क्रिय होऊ नये म्हणून काय करावे?
तुम्हाला तुमचे पीएनबी खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवायचे असेल, तर तुम्हाला लवकरात लवकरच तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन प्रथम केवायसी (KYC) करावी लागेल. कारण KYC शिवाय बँक तुमचे खाते सक्रिय करू शकणार नाही.