जर तुम्हालाही हवा असेल मोफत गॅस सिलेंडर, तर मग याप्रमाणे करा अर्ज, PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Apply Online 2024

2 Min Read
Pradhan Mantri Ujjwala Yojana Free Gas Cylinder Apply Online 2024

Pradhan Mantri Ujjwala Yojana Online Apply 2024 : आजही आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर नाही. म्हणूनच आजही अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. अशा कुटुंबाना मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार महिलांना मोफत गॅस सिलेंडर पुरवते. जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हालाही या योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर मिळू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात… (Learn how to apply for a free gas cylinder under Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024. Follow the step-by-step guide to submit your application and get your free LPG connection today).

याप्रमाणे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता

  • 1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmuy.gov.in/ वर जावा.
  • 2: त्यानंतर ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ या पर्यायावर क्लिक करा.
  • 3:  त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यात तुम्हाला गॅस सिलेंडर कंपनी निवडण्यासाठी पर्याय दिसेल.
  • 4: तुम्हाला ज्या कंपनीचा सिलेंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या बाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
  • 5: यानंतर दुसरे नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला अर्जदाराचे नाव, वितरकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, तुमचा पिन भरावा लागेल.
  • 6: सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • 7: यानंतर Apply बटणावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमची घरबसल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article