माझी लाडकी बहीण नंतर महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवीन योजना सुरु, जाणून घ्या काय आहे Punyashlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana 2024 Maharashtra

3 Min Read
🔴 ही बातमी वाचली का?🤞

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात सरकारी योजनांची जोरदार चर्चा सुरु असताना अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (After Majhi Ladki Bahin Yojana, PM Modi launches Punyashlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana offering ₹25 lakh to women entrepreneurs in Maharashtra. Know eligibility and apply now).

New Sarkari Yojana Maharashtra 2024 for Womens : वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (Punyashlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana) ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजने’चे उद्घाटन झाले आहे. या योजनेचा उद्देश महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Punyashlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana | महिला स्टार्टअप योजनेचे महत्त्व

Ahilyabai Holkar Mahila Startup ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजने’अंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाईल. या अंतर्गत पात्र महिलांना 25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मीळेल, जेणेकरून महिला त्यांचे नवीन व्यवसाय सुरु करू शकतील.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेंतर्गत एकूण तरतुदींपैकी २५ टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कोणती अडचण येणार नाही.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना पात्रता 

  • 1 नोंदणी: स्टार्टअपला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे.
  • 2. महिलांचा हिस्सा: स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक किंवा सह-संस्थापकाचा किमान 51 टक्के हिस्सा असला पाहिजे. 
  • 3. कालावधी: महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्स किमान एक वर्षांपासून कार्यरत असायला हवा.
  • 4. वार्षिक उलाढाल: या सुरुवातीच्या कालावधीत, स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान असली पाहिजे.
  • 5. यापूर्वी मिळालेला आर्थिक लाभ : महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपने यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अर्ज प्रक्रिया

महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारे लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.msins.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज केल्यानंतर, योग्य निवड प्रक्रियेद्वारे पात्र स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article