Ration Card Maharashtra News : आता तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित कोणत्याही कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. रेशन कार्डशी संबंधित सर्व प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने एक नवीन मोबाइल ॲप लॉन्च केले आहे, मेरा राशन 2.0 (Mera Ration 2.0 App) असे या ॲपचे नाव आहे.
मेरा राशन 2.0 ॲपची वैशिष्ट्ये
मेरा राशन 2.0 ॲप तुम्ही Google Play Store वरून सहज डाउनलोड करू शकता. या ॲपच्या मदतीने तुम्ही खालील कामे घरबसल्या झटपट करू शकता.
- 1: कुटुंबाची माहिती अपडेट करणे: रेशनकार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे जोडणे किंवा हटवणे आता सोपे झाले आहे. या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती सहज अपडेट करू शकता.
- 2: सरकारकडून तुम्हाला किती रेशन मिळते: या ॲपद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या कुटुंबाला सरकारकडून किती रेशन मिळत आहे.
- 3: रेशनकार्ड ट्रैक करू शकता: तुम्ही तुमचे रेशन कार्ड तुमच्या रेशन डीलरपर्यंत पोहोचले की नाही हे तपासू शकता.
- 4: समस्या निवरण: रेशन कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही या ॲपद्वारे तक्रार दाखल करू शकता.
- 5: पावती मिळवणे: जर तुम्हाला रेशन मिळाल्यानंतर पावती मिळाली नसेल, तर तुम्ही ती ऑनलाइन मिळवू शकता.
- 6: नवीन सरकारी लाभ: या ॲपद्वारे तुम्ही रेशनकार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या सरकारी लाभांची माहिती मिळवू शकता.
- 7: जवळचा रेशन डीलर: तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन डीलरची माहिती मिळवू शकता.
- 8: रेशनकार्ड सरेंडर करू शकता: जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बंद करायचे असेल तर तुम्ही हा पर्याय वापरून तुमचे रेशनकार्ड बंद करू शकता.
- 9: रेशनकार्डचे हस्तांतरण : रेशनकार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे.
मेरा राशन 2.0 ॲप कसे डाउनलोड करावे आणि हे ॲप कसे वापरावे
- 1. सर्व प्रथम, Google Play Store वर जा आणि मेरा राशन 2.0 ॲप शोधा.
- 2. ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
- 3. इन्स्टॉल केल्यानंतर ॲपचा डॅशबोर्ड उघडेल.
- 4. येथे तुम्हाला सर्व सुविधा दिसतील. तुम्हाला ज्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यावर क्लिक करा.
- 5. मागितलेली माहिती भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now