RBI New Rule to recover money sent to Wrong UPI Address | चुकीच्या UPI पत्त्यावर पाठवलेले पैसे परत मिळवण्यासाठी RBI चा नवीन नियम: सध्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बहुतांश लोक UPI चा वापर करतात. मात्र, अनेकदा घाई गडबडीत लोक चुकीच्या व्यक्तीला UPI पेमेंट करतात. RBI च्या नवीन नियमानुसार आता UPI वरून चुकून दुसऱ्याला पाठवले गेलेले पैसे आता परत मिळवणे सोपे झाले आहे.
RBI New Rule to recover money sent to Wrong UPI Address : डिजिटल इंडियाच्या युगात, प्रत्येकाला काही कारणास्तव ऑनलाइन पेमेंट करण्याची गरज पडतेच. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी बहुतांश लोक UPI चा वापर करतात. पण, अनेक वेळा घाईघाईने लोक पैसे पाठवतात आणी ते चुकून दुसऱ्याला जातात, जे परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे आता तुम्हाला तुमचे पैसे २४ ते ४८ तासांच्या आत परत मिळतील.
UPI वरून चुकून दुसऱ्याला पैसे पाठवले गेले तर RBI काय करण्याचा सल्ला देते?
UPI वरून चुकून दुसऱ्याला पाठवले गेलेले पैसे असे परत मिळवा:
- 1. पैसे परत मागा
पैसे परत मिळवण्यासाठी पहिला तुम्ही, ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले गेले आहेत त्याच्याशी संपर्क साधा आणी त्या व्यक्तीस व्यवहाराचे तपशील पाठवून, तुम्ही त्याला पैसे परत पाठवण्याची विनंती करा.
- 2. UPI कस्टमर सपोर्ट
चुकीच्या व्यवहाराची तक्रार करण्यासाठी, UPI ॲपवर असणाऱ्या कस्टमर सपोर्ट टीमशी बोला. त्यांना चुकीच्या व्यवहाराचे सर्व तपशील द्या आणि त्यांना पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगा.
- 3. NPCI कडे तक्रार दाखल करा
UPI पेमेंट सिस्टम NPCI अंतर्गत येते. त्यामुळे तुम्ही चुकीचा UPI व्यवहार केल्यास, तुम्ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे तक्रार दाखल करू शकता. जर तुम्ही चुकीच्या व्यवहाराचे सर्व पुरावे सादर केले तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.
- 4. बँकेशी संपर्क साधा
चुकीच्या ठिकाणी पैसे पाठवले गेल्यानंतर तुम्ही बँकेशीही संपर्क साधू शकता. चुकीच्या UPI व्यवहाराचे सर्व तपशील बँकेला दाखवा. तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी तुमची बँक देखील तुम्हाला मदत करू शकते.
- 5. टोल फ्री नंबरवर कॉल करा (त्वरित हे करा)
UPI द्वारे तुमच्याकडून चुकीचा व्यवहार झाल्यास, तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तुमचे पैसे परत मिळवू शकता. यासाठी, टोल फ्री नंबर – 18001201740 वर कॉल करा आणि तुमची तक्रार नोंदवा. याद्वारे तुम्हाला तुमचे पैसे लवकरच परत मिळू शकतात.