Majhi Ladki Bahin योजनेसोबतच या सरकारी योजना सुद्धा आहेत महिलांसाठी खूपच फायदेशीर | Sarkari Yojana for Women in Maharashtra

8 Min Read
Sarkari Yojana For Women In Maharashtra Benefits

Majhi Ladki Bahin योजनेसोबतच या सरकारी योजना सुद्धा आहेत महिलांसाठी खूप फायदेशीर | Sarkari Yojana for Women in Maharashtra

Sarkari Yojana for Women in Maharashtra: राज्य आणि केंद्र सरकार महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश महिलांना सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे. परंतु, अनेक महिलांना या योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांच्यासाठी असणाऱ्या खास योजनांचा लाभ घेता येत नाही. येथे आम्ही तुम्हाला केंद्र सरकारद्वारे महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत. (Government schemes for women in Maharashtra in Marathi).

माझी लाडकी बहीण योजना | Majhi Ladki Bahin Yojana

‘माझी लाडकी बहीण योजना’ (या योजनेबद्दल तर तुम्हाला माहित असेलच. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील मुलींना व महिलांना दरमहा १५०० रुपये रक्कम लाभ स्वरूपात दिली जाणार आहे. आता आपण माझी लाडकी बहीण योजना सोडून महिलांसाठी असणाऱ्या ईतर योजनांबद्दल माहिती जाणून घेऊयात…

महिलांसाठीच्या योजना: या सरकारी योजना महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत

Government Scheme for Ladies in Maharashtra: आपल्या देशात केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा या योजनांचा उद्देश आहे. भारतात अशा अनेक (Mahila Yojana) योजना आहेत ज्या केवळ महिलांसाठी चालवल्या जात आहेत, त्यामुळे सर्व महिलांना त्यांच्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती असणे गरजेचे आहे. येथे आम्ही तुम्हाला फक्त सध्या सुरु असणाऱ्या योजनांबद्दल माहिती देणार आहोत. अजून सुरु न झालेल्या किंवा महाराष्ट्रात लवकरच सुरु होणाऱ्या महिलांसाठीच्या नवीन योजनांबद्दलच्या ताज्या बातम्या तुमच्या फोनवर मिळवण्यासाठी ‘मराठी सरकारी योजना व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा’, आणि नव्याने सुरु होणाऱ्या सरकारी योजनांची माहिती मिळवा.

भारतात महिलांसाठी सुरु असलेल्या ‘महिला समृद्धी योजना’ ते मुद्रा योजनेपर्यंत अनेक योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अनेक महिलांना त्याबाबत वेळीच माहिती न मिळाल्याने, अनेक सरकारी योजनांचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळत नाही.

जेव्हा केंद्र सरकार एखादी नवीन योजना जाहीर करते, तेव्हा ती देशातील सर्व राज्यांमध्ये लागू होते. आणि जेव्हा राज्य सरकार एखाद्या नवीन योजनेची घोषणा करते, तेव्हा ती योजना केवळ त्या राज्यामध्ये लागू केली जाते. आज आपण केंद्र सरकारद्वारे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या काही फायदेशीर योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Womens Choir Scheme | महिला कॉयर योजना

Mahila Coir Yojana: महिला कॉयर योजना अंतर्गत महिला कौशल्य विकासाला चालना दिली जाते. या योजनेद्वारे नारळ उद्योगाशी संबंधित महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जातात. कॉयर स्पिनिंगचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यासाठी महिलांना 3 हजार रुपये मासिक भत्ताही दिला जातो. जर एखाद्या महिलेला नारळ प्रक्रिया युनिट सुरू करायचे असेल, तर सरकारकडून 75 टक्के कर्ज सहज मिळते.

महिला कोइर योजनेंतर्गत, प्रशिक्षित महिलांना कॉयर युनिट्सची स्थापना करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजनेअंतर्गत मदत दिली जाते. ही योजना महिलांना उद्योजक बनवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

Mahila Samridhi Yojana | महिला समृद्धी योजना

महिलांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून महिला समृद्धी योजना (Mahila Samridhi Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1.40 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळते. याशिवाय, महिलांना कर्जावरील व्याजावरही सूट दिली जाते. मागासवर्गीय किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमवीवाई)

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गर्भवती महिलांसाठी असणारी एक योजना (PM Matru Vandana Yojana) आहे. या योजनेअंतर्गत सरकार गरोदर महिलांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात पाठवले जातात. कुपोषित बालकांच्या जन्माची समस्या लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी नसावे.

Stand Up India Scheme | स्टँडअप इंडिया योजना

Stand Up India Yojana: तळागाळातील उद्योजकतेला चालना देऊन आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती करणे हा ‘स्टँडअप इंडिया योजना’ योजनेचा प्रमुख उद्देश आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रे व कृषी क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही योजना आहे.

Pradhanmantri Ujjwala Yojana | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

स्टोव्हमध्ये लाकूड आणि कोळसा जाळून स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे धोक्यात असलेले आरोग्य सुधारणे हा ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ योजनेचा उद्देश आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचा गॅस पुरवते, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातील बीपीएल कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ मिळू शकेल.

सरकार महिलांना अनुदानावर गॅस सिलिंडर पुरवते. याशिवाय, नवीन कनेक्शन घेतल्यावर 1,600 रुपयांची आर्थिक मदत देखील दिली जाते, जेणेकरून गॅस कनेक्शनशी संबंधित आवश्यक वस्तू खरेदी करता येतील.

Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

Beti Bachao Beti Padhao Yojana: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश मुलींची कमी होणारी संख्या थांबवणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन मंत्रालय यांच्या तर्फे राबवली जाते.

ही योजना विविध भागांमध्ये चालवली जात आहे आणि हिंसाचारग्रस्त महिलांना मदत करते. एखादी महिला कोणत्याही हिंसाचाराला बळी पडल्यास, ती टोल फ्री क्रमांक 181 वर कॉल करून मदत मागू शकते.

Free Silai Machine Yojana | मोफत शिलाई मशिन योजना

Free Silai Machine Yojana: केंद्र सरकारने शिवणकाम आणि भरतकामाची आवड असलेल्या महिलांसाठी **मोफत शिलाई मशीन योजना** सुरू केली. ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत फक्त 20 ते 40 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकतात, आणि त्याचबरोबर, लाभार्थी महिलेच्या पतीचे उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Mahila Shakti Kendra Yojana | महिला शक्ती केंद्र योजना

Mahila Shakti Kendra Yojana: शासकीय योजना आणि कार्यक्रमांबाबत तसेच जिल्ह्यातील महिलांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात महिला शक्ती केंद्र योजना महत्त्वाची भूमिका बजावते.

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा हब सर्व स्तरांवर महिलांना त्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकास करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कार्यस्थळांमध्ये आणि समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व म्हणून उत्कृष्ट बनण्यास सक्षम करते.

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजना मोदी सरकारने 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली होती. ही योजना 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आहे. तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. योजना पूर्ण झाल्यानंतर, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हे खाते उघडले आहे त्यांना सर्व पैसे व्याजासह विना आयकर परत मिळतात.

Mudra Loan Yojana | मुद्रा कर्ज योजना

Mudra Loan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील महिला, छोटे व्यावसायिक, व्यावसायिक, कारखानदार आणि एमएसएमई उद्योगांसाठी 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू केली. महिलांना उद्योगासाठी कर्ज देण्यासाठी मोदी सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत तीन प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे: शिशु योजना, किशोर योजना आणि तरुण योजना. तुम्ही या तीन योजना अंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

(Sarkari yojana for women in Maharashtra).

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now