Soap Business Idea in Marathi: साबण निर्मिती व्यवसाय सुरु करून मोठी कमाई करता येते. हा व्यवसाय करण्यासाठी (Mudra Yojana) मुद्रा योजनेंतर्गत कर्जही मिळते. साबण ही रोजच्या वापरातील वस्तू असल्याने लहान गाव असोत वा मोठी शहरे सर्वत्र साबणाला दररोज मागणी असते. आणी अगदी कमी पैसे गुंतवून तुम्ही स्वतःचा साबण निर्मिती व्यवसाय सुरु करू शकता. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या… (how to start soap manufacturing business | साबण निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा):
Business Idea: लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र साबणाची मागणी आहे. जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरु करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
Matathi Sarkari Yojana News: हा असा व्यवसाय आहे. ज्यामध्ये प्रत्येक श्रेणीतील लोकांमध्ये उत्पादनाची मागणी आहे. गाव असो वा शहर, या उत्पादनाला मोठी मागणी आहे. आम्ही साबण बनवण्याच्या कारखान्याबद्दल बोलत आहोत, म्हणजे साबण उत्पादन युनिट. या व्यवसायात मशिनच्या मदतीने साबण बनवले जातात. अनेक जण हाताने साबण बनवून बाजारात विकतात. पण, आपण आज येथे मशिनच्या मदतीने साबण बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा ते जाणून घेणार आहोत. आणी विशेष गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणात सुरू करता येतो. आणी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला एक सरकारी योजना मदत करते.
साबणाची मागणी लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडेच आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. अगदी कमी पैशात तुम्ही साबण कारखाना उघडू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकता. तुम्हाला फक्त 20% पैसे गुंतवावे लागतील. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साबण व्यवसायासाठी सरकारी योजना देते सहज कर्ज
साबण उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. यामध्ये युनिट जागा, यंत्रसामग्री, तीन महिन्यांचे खेळते भांडवल या सगळ्याचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये गुंतवावे लागतील. बाकीची उरलेली रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता. साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी, तुम्हाला एकूण 750 चौरस फूट लागेल. यामध्ये 500 चौरस फूट जागा झाकून उर्वरित जागा उघडी ठेवावी लागते. यासाठी सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची यंत्रे लागणार आहेत. प्रकल्प अहवालानुसार ही यंत्रे बसवण्यासाठी एकूण खर्च फक्त एक लाख रुपये येणार आहे.
तुम्ही कपडे धुण्याचा साबण, भांडी धुण्याचा साबण, सौंदर्य साबण, औषधी साबण,ई. बाजारातील मागणी लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा साबणं बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता.
साबण उत्पादन व्यवसायातून किती रुपये कमाई होईल
केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण 4 लाख किलो उत्पादन करू शकाल. त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये होते. व्यवसायातील सर्व खर्च वजा करून तुम्हाला दरमहा 6 लाख रुपये म्हणजेच 50,000 रुपये निव्वळ नफा मिळेल. तुम्ही जर कमी भांडवलत एखादा छोटा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर या व्यवसायचा विचार करू शकता.