Soybean Hami Bhav 2024 : कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्र (Maharashtra) आणी कर्नाटक (Karnataka) या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. सोयाबीनला किमान किती रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव मीळेल त्याबद्दल जाणून घ्या…
Soybean Price News : केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांनी केलेली मागणी मान्य करत समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणी उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
Soybean Hami Bhav 2024 | सोयाबीन हमी भाव 2024
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे. आणी आता लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे.