Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी (SSY) योजनेतील ठेवींमध्ये सतत वाढ होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, या योजनेतील थकबाकी ठेवी फेब्रुवारी 2023 मध्ये 77,472 कोटी रुपये होत्या, त्या आता फेब्रुवारी 2024 मध्ये 1 लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत. या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (Secure your daughter’s future with Sukanya Samriddhi Yojana. Get high interest rates, tax-free returns, and a safe government-backed scheme for your girl child’s education and future).
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी खाते उघडता येते. हे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यावर परिपक्व होते. पालक त्यांच्या फक्त दोनच मुलींसाठी हे खाते उघडू शकतात. कुटुंबात तीन मुली असल्यास, दुसरी आणि तिसरी मुलगी जुळी असेल तरच तिचे खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
आकर्षक व्याजदर: ही योजना दर वर्षी 8.2% व्याज देते.
करमुक्त लाभ: योजनेअंतर्गत मिळणारे व्याज आणि मुदतपूर्ती नंतर मिळणारी रक्कम दोन्ही करमुक्त आहेत.
सरकार समर्थित: ही योजना बाजारातील जोखमीपासून सुरक्षित आहे, कारण ही सरकारद्वारे चालवली जाते.
सुकन्या समृद्धी योजना आणी PPF मधील फरक
व्याज दर: सुकन्या समृद्धी योजना 8.2% व्याज देते, तर PPF मध्ये ते फक्त 7.1% आहे.
लाभार्थी: सुकन्या समृद्धी योजना फक्त 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी आहे, तर PPF मध्ये कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते.
परिपक्वता कालावधी: सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होते याचा कालावधी वाढवता येत नाही. तर, पीपीएफचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो आणि तो अनिश्चित काळासाठी वाढविला जाऊ शकतो.
पैसे काढण्याची प्रक्रिया: सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. 12 वी किंवा पदवी शिक्षणासाठी पैसे आवश्यक असल्यास 50% पर्यंत रक्कम काढता येते.
जर तुम्ही तुमचे पैसे दीर्घ कालावधीसाठी गुंतवून इच्छित असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्या पालकांना त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी गुंतवणूकीचा हा एक उत्तम पर्याय आहे.