Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 Registration Process: जर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार कडून आता (४ ० टक्के ते ५० टक्के) ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे… (Apply for the Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 and receive up to ₹5 lakh subsidy for tractor purchase. Learn the online application process and eligibility details here).
शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खूपच कामी पडत असला तरी देखील सध्याच्या वाढत्या महागाईत रोख पैसे देऊन ट्रॅक्टर खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला परवडत नाही आणी कोणत्याही खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केल्यास खूपच व्याज द्यावे लागते. म्हणून अनेक शेतकरी गरज असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत.
पण आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ४० टक्के ते ५० टक्के अनुदान देत आहे. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतीच्या कामासाठी नवीन ट्रॅक्टर (New Tractor) खरेदी करू इच्चीत असाल तर ट्रॅक्टर अनुदान योजना (Tractor Subsidy Maharashtra) तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- 1: ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा.
- 2: नोंदणी केल्यावर मिळणारा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- 3: कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
- 4: त्यानंतर ‘कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य’, ट्रॅक्टर आणी 2 डब्लू डी, हे पर्याय निवडून विचारलेली माहिती व्यवस्थित भरून अर्ज सादर करा.
- 5: ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी केलेल्या अर्जाची पावती डाउनलोड करा.