1 सप्टेंबरपासून देशात नवीन नियम लागू, ॲक्शन मोडवर TRAI- आता ही Sim Cards काळ्या यादीत

2 Min Read
Trai New Rules For Sim Cards September 2024

Trai New Rules For Sim | ट्राय सिमसाठी नवीन नियम: जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर तुम्हालाही स्पॅम आणि प्रमोशनल कॉलच्या समस्येचा सामना करावा लागला असेल. अनेक वेळा अशा कॉलद्वारे फसवणूकही केली जाते. आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण या प्रकरणी कठोर झाले आहे.  स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी ट्राय 1 सप्टेंबरपासून देशात नवीन नियम लागू करणार आहे.

स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकार दीर्घकाळापासून काम करत आहे. बनावट आणि स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी कंपनीने AI फीचर देखील सादर केले पण त्याचा जास्त फायदा झाला नाही. आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने एक नवीन नियम लागू केला आहे जो 1 सप्टेंबर 2024 पासून संपूर्ण देशात लागू होईल. 

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

1 सप्टेंबरपासून देशभरात नवीन सिमकार्ड नियम लागू होणार आहे. यानंतर तुम्ही फेक कॉल्सपासूनही सुटका मिळवू शकता. ट्रायने आता फेक कॉलसाठी टेलिकॉम कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. जर एखाद्या ग्राहकाने कंपनीकडे फेक कॉलची तक्रार केली तर त्याची जबाबदारी टेलिकॉम कंपन्यांना घ्यावी लागणार आहे.

फेक कॉल्स टाळण्यासाठी ट्रायचा स्मार्ट ॲक्शन प्लॅन

फसवणुक करणारे लोकांची फसवणुक कसरण्यासाठी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत असतात. यापासून ग्राहकांना वाचवण्यासाठी ट्रायने नवा नियम आणला आहे. एक संदेश देत, ट्रायने कडक शब्दात सांगितले आहे की बनावट आणि प्रचारात्मक कॉलसाठी चुकीच्या पद्धती अवलंबल्या जात आहेत जे दूरसंचार नियमांच्या विरोधात आहेत. ट्रायने फेक कॉल्स टाळण्यासाठी स्मार्ट ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. 

ट्रायच्या अहवालानुसार, जर कोणी टेलिमार्केटिंग कॉलसाठी त्याचा वैयक्तिक मोबाइल नंबर वापरला तर त्याचा मोबाइल नंबर 2 वर्षांसाठी काळ्या यादीत (Black List) मध्ये टाकला जाईल. लोकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सरकारने 160 क्रमांकाची मालिका सुरू केली आहे, परंतु अजूनही लोकांना खाजगी क्रमांकांवरून प्रचारात्मक कॉल येत आहेत. 

ट्राय कडून केली जाईल कडक कारवाई

आता स्पॅम कॉलचा मुद्दा अजिबात खपवून घेणार नाही, असा कडक संदेश ट्रायने दिला आहे. याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे ट्रायने सांगितले आहे. ट्रायने फसवणूक आणि स्पॅम कॉल्सबाबत कठोर भूमिका घेतली आहे. 1 सप्टेंबरपासून संबंध देशात ट्रायचा नवीन नियम लागू होणार आहे. जर तुम्ही तुमचा नंबर प्रमोशनल कॉलसाठी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article