Vijay Wadettiwar Questions Majhi Ladki Bahin Yojana 2025 : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाघ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या (Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसाठी मोठा वाद उभा राहिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Read the latest updates on Majhi Ladki Bahin Yojana in Maharashtra. Congress leader Vijay Wadettiwar questions the government on financial aid for women, will it be 2100 or 1500 rupees? Get all the details about the ongoing political debate, farmers’ issues).
Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारला की, “2025 मध्ये सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार का १५०० रुपये?, हे स्पष्ट करा. कर्जमाफीच्या वचनाबद्दल शिंदे सरकारने जी घोषणा केली होती ती फसवी आहे का?, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अजून अनुत्तरीत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
“शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु केलेल्या मुख्यमंत्री योजना दूत योजनेची (Mukhyamantri Yojana Doot 2025) काय स्थिती आहे? तरुणांच्या भविष्याचा खेळ सुरू आहे का?, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वचन दिले गेले असले तरी, त्याचा परिणाम अद्याप दिसत नाही.”
त्याचवेळी, राज्यातील कृषी आणि पोलीस प्रशासनावरही वडेट्टीवार यांनी सवाल केला आहे. “धान्य खरेदी आणि शेतकरी नोंदणीबाबत मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा. तसेच पोलिसांच्या कामगिरीवर देखील लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यातील पोलिसांची प्रतिमा सध्या मलिन होत आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकारच्या ‘Mazi Ladki Bahin Yojana’ या योजने विषयी प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सरकारकडून लवकरच उत्तरे दिली जातील अशी आशा आहे. मात्र, आगामी काळात माझी लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana 2025) योग्य अंमलबजावणी कशी होईल आणि योजनेत काय नवीन बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.