1जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1,500 रुपयांची अर्थीक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या आहेत.
4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील सर्व पात्र महिलांना देण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावार व्हायरल झाली होती.
पण, त्या बातमीस कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला न्हवता. तसेच महाराष्ट्र शासन तथा संबंधित विभागाकडून दिवाळी बोनस बाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली न्हवती.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असे आवाहन केले आहे.